मोठी बातमी : प्रवाशांच्या जीवाशी खेळ, एअर इंडियाचे विमान बंद धावपट्टीवर उतरवले

सामना ऑनलाईन । माले

केरळच्या तिरुवनंतपूरम येथून मालदीवकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान मालदीवच्या माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंद असलेल्या धावपट्टीवर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. मात्र विमान सुरक्षितरित्या उतरल्याने या विमानातील 136 प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. या विमानाचे दोन टायर फुटले असून विमानाला ट्रॅक्टरने ओढून पार्किंगमध्ये लावण्यात आले.

एअर इंडियाच्या माहितीनुसार, ए 1263 हे विमान चुकीचा संदेश मिळाल्याने माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांधकाम सुरु असलेल्या धावपट्टीवर उतरले. दरम्यान, या विमानातून प्रवास करणारे 130 प्रवाशी आणि क्रू मेंबर्स पूर्णतः सुरक्षित आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.