चेन्नई विमानतळावर 24 किलो सोने जप्त, दोन दक्षिण कोरियन ताब्यात


सामना ऑनलाईन । तामिळनाडू

चेन्नई सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने चेन्नई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन दक्षिण कोरियन नागरिकांकडून 24 किलो वजनाची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 8 कोटी रुपये इतकी आहे. सीमाशुल्क विभागाने दोन्ही दक्षिण कोरियन नागरिकांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.