प्रदूषणामुळे दिल्लीकरांच्या आयुष्यात 10 वर्षांची घट, विद्यापीठाचा खळबळजनक अहवाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीत प्रदूषणामुळे नागरिकांचे सरासरी आयुष्य 10 वर्षांनी कमी होतं आहे असं शिकागोतील मिल्टन फ्रॉइडमन विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे. गेल्या 20 वर्षात दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स( हवेचा शुद्धता गुणांक) प्रचंड कमी झाला आहे.

कोणत्याही शहरातील नागरिकांच्या जीवनमानावर तेथील हवामानाचा परिणाम होत असतो. शहराच्या हवेच्या दर्जावरून तेथील नागरिक किती वर्षं निरोगी आयुष्य जगतील हे ठरतं. दिल्लीत गेल्या 20 वर्षांत हवेचा दर्जा घसरत चालला आहे तर दुसरीकडे दुषित वायूचे आणि विषारी धुलीकणांचे प्रमाण वाढत चालले आहे.

एक्यूआय घसरल्याने युपीकरांच्या आयुष्यात 8 वर्षांची घट
हवेच्या दर्जाचा जीवनमानावर होणारा परिणाम मोजणारे मापक म्हणजे एक्यूएलआय( एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स). दिल्लीचा एक्युएलआय गेल्या काही वर्षांत प्रचंड घसरला आहे. 2.5 एक्युएलआय ही चांगली निशाणी आहे. पण दिल्लीचा एक्युएलआय याहून कितीतरी कमी आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तो धोकादायक पातळीसुद्धा ओलांडतो. दिल्लीप्रमाणेच उत्तर हिंदुस्थानी राज्यांची परिस्थितीही फार वेगळी नाही. उत्तर प्रदेशातील जनतेचे आयुष्यही प्रदूषणामुळे 8 वर्षांनी कमी झाले आहे.