दुर्घटनाग्रस्त AN-32 मधील सर्व 13 जण शहीद

5

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हवाई दलाचे शोध पथक गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त AN-32 च्या घटनास्थळावर पोहोचले. मात्र त्या ठिकाणी कोणीही जिवंत स्थितीत आढळलं नाही. या संदर्भात हिंदुस्थानच्या लष्काराने विमानातील सर्व 13 जणांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आहे. या घटनेतील शहिदांना हवाईदलाने श्रद्धांजली वाहिली.

3 जून रोजी आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या AN-32 चे अवशेष 11 जून रोजी अरुणाचल प्रदेशातील टेटो परिसरात सापडले होते. त्यानंतर घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र खराब हवामानामुळे तिथे पोहोचता येत नव्हते. बुधवारी 15 गिर्यारोहकांना एमआय-17s आणि एडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (ALH) च्या मदतीने घटनास्थळाच्या जवळ पोहोचवण्यात आले. त्यानंतर आज शोध पथकाला तेथे पोहोचण्यात यश आले. मात्र या अपघातग्रस्त विमानातील कोणीही वाचू शकले नव्हते. अखेर त्यांनी माहिती हवाई दलाला कळवली.

या दुर्घटनेत विंग कमांडर जीएम चार्ल्स, स्काडर्न लिडर एच विनोद, फ्लाईट लेफ्टनंट आर थापा, फ्लाईट लेफ्टनंट ए तन्वर, फ्लाईट लेफ्टनंट एस मोहंती, फ्लाईट लेफ्टनंट एमके गर्ग, वॉरंट ऑफिसर केके मिश्रा, अनूप कुमार, शेरिन, लीड एअरक्राफ्ट मॅन एसके सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, पुताली आणि राजेश कुमार हे शहीद झाले.

आपली प्रतिक्रिया द्या