चिदंबरम यांची सहा तास चौकशी

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांची ‘ईडी’ने सहा तास कसून चौकशी केली. चिदंबरम यांना चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी बोलावण्यात आले होते. याआधीही ५ जूनला ‘ईडी’ने त्यांची या प्रकरणी चौकशी केली आहे. एअरसेल मॅक्सिस करारात चिदंबरम यांची नेमकी भूमिका काय होती याबाबत त्यांना अधिकाऱयांनी प्रश्न विचारले. चौकशीसाठी ११ वाजता चिदंबरम ईडीच्या कार्यालयात पोहचले. त्यानंतर त्यांना संध्याकाळी ५ वाजेनंतर सोडण्यात आले. या प्रकरणी त्यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या