माल्टा विमान अपहरणातील १०९ प्रवाशांची सुटका

सामना ऑनलाईन । त्रिपोली

लीबियामध्ये एका आफ्रिकन एअरलाईन्स विमानाचे अपहरण करण्यात आले होते. हे विमान उडविण्याची धमकी अपहरणकर्त्यानी दिली होती. विमानात ११८ प्रवासी त्यापैकी ८२ पुरुष व २८ महिला होत्या. हे विमान माल्टा येथे उतरविण्यात आले. अपहरणकर्त्यानी रात्री उशीरा विमानातील १०९ प्रवाशांना विमानाबाहेर सोडले, अशी माहिती माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मुस्कॉट यांनी दिली.

आफ्रिकीयाह एयरवेजच्या एयरबस ए ३२० चे अपहरणकर्त्यांनी लिबीयातून अपहरण केले होते. या विमानातील दोन अपहरणकर्त्यांकडे बॉम्ब आहेत. त्याच्यांशी चर्चा सुरु आहे, अशी माहिती माल्टाचे पंतप्रधान जॉकेफ मस्कट यांनी ट्विटरवरून दिली होती. दरम्यान, या विमान अपहरणानंतर देशातील सर्व विमानतळावर अतीदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.