११८ प्रवाशी असलेल्या विमानाचे लीबियात अपहरण

सामना ऑनलाईन । त्रिपोली

लीबियामध्ये एका आफ्रिकन एअरलाईन्स विमानाचे अपहरण करण्यात आले आहे. हे विमान उडविण्याची धमकी अपहरणकर्त्यानी दिली आहे. विमानात ११८ प्रवासी असून यात ८२ पुरुष व २८ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, अपहरणकर्त्यानी हे विमान माल्टामध्ये उतरवले आहे. विमानातील काही महिला व मुलांना अपहरणकर्त्यांनी सोडले आहे.

विमानातील दोन अपहरणकर्त्यांकडे बॉम्ब आहेत. त्याच्यांशी चर्चा सुरु आहे, अशी माहिती माल्टाचे पंतप्रधान जॉकेफ मस्कट यांनी ट्विटरवरून दिली आहे. दरम्यान, या विमान अपहरणानंतर देशातील सर्व विमानतळावर अतीदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.