ऐश्वर्या रायच माझी आई – २९ वर्षाच्या तरूणाचा दावा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली असून त्यांना पाच वर्षाची आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्याला आराध्या ही एकच मुलगी असल्याचे सर्वांना माहित आहे. पण आंध्र प्रदेशमधील चक्क एका २९ वर्षीय तरूणाने ऐश्वर्या ही त्याची आई असल्याचा दावा केला आहे. तसेच त्याला आता या पुढचे आयुष्य त्याच्या आईसोबतच म्हणजे ऐश्वर्यासोबतच राहायचे आहे.

आंध्र प्रदेशीमधील विशाखापट्टनम येथे राहणाऱ्या संगीथ कुमार याने ऐश्वर्या राय ही त्याची आई असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. “मिस वर्ल्ड होण्याच्या सहा वर्ष आधी म्हणजेच १९८८ ऐश्वर्या रायने लंडन येथे मला जन्म दिला. आयव्हीएफच्या मदतीने तिने मला जन्म दिला. त्यानंतर दोन वर्ष मला माझे आजी आजोबा वृंदा राय आणि कृष्णराज राय यांनी मला सांभाळले. त्यानंतर त्यांनी मला आदिवेलु रेड्डी यांच्याकडे सोपविले व ते मला आंध्र प्रदेश येथे घेऊन आले. तेव्हापासून मी इथेच राहत आहे. असे संगीथ कुमार याने प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच यावेळी संगीतने त्याच्याकडील सर्व पुरावे त्याच्या नातेवाईकांनी जाळून टाकल्याचा देखील त्याने आरोप केला आहे.

संगीथला आता ऐश्वर्यासोबत राहायचे असल्याचे त्याने सांगितले आहे. “मला २७ वर्ष माझ्या आईपासून दूर ठेवले आहे. पण आता मला माझ्या आईसोबतच राहायचे आहे. सध्या माझी आई अभिषेक बच्चन पासून वेगळी राहत आहे. त्यामुळे मला आता तिच्यासोबत राहायचे आहे.”असे देखील संगीथने सांगितले आहे.