ऐश्वर्या राय कडे गु़ड न्यूज?

7

सामना ऑनलाईन । मुंबई

माजी विश्वसुंदरी व बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या हीच्याकडे गुड न्यूज असल्याची चर्चा सध्या बीटाऊन मध्ये रंगली आहे. ऐश्वर्या ही दुसऱ्यांदा गरोदर असल्यामुळे सध्या ती कोणत्याही चित्रपटाच्या ऑफर्सही स्वीकारत नसल्याचे बोलले जात आहे.

ऐश्वर्या सध्या अभिषेक बच्चन सोबत गोव्यात फिरायला गेली आहे. तिथले त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात ऐश्वर्याचा बेबी बंप दिसत असून त्यावरूनच ती गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांचे 2007 मध्ये लग्न झाले. त्यानंतर त्यांना नोव्हेंबर 2011 मध्ये आराध्या ही मुलगी झाली.