ऐश्वर्या अन्नदान करणार

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिने १ नोव्हेंबर रोजी ४४ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा कोणत्याही पार्टीचे आयोजन करण्यात आले नाही. उलट जन्मदिवसाचे औचित्य साधून ‘ऐश्वर्या मिड डे मील’अंतर्गत एक हजार मुलांच्या जेवणाचा खर्च करणार आहे.

अन्नमित्र फाऊंडेशनच्या मार्फत ‘मिड डे मील’चा कार्यक्रम सुरू आहे. या उपक्रमाला ऍशचा हातभार लागणार आहे. सात राज्यांतील दहा लाखांहून अधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. ऐश्वर्याने अन्नदानातून अनोखा आदर्श सेलिब्रेटींसमोर ठेवला आहे.