अजय देवगन साकारणार हॉकी प्रशिक्षकाची भूमिका?

61

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अजय देवगन त्याच्या आगामी चित्रपटामध्ये हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ‘मॉम’ चित्रपटाचे दिग्दर्शक रवी उदयावर आपल्या आगामी चित्रपटामध्ये अजय देवगनला घेण्याच्या तयारीत आहे. अजयने ही ऑफर स्वीकारल्यास त्याचा हा पहिलाच स्पोर्ट्स बेस्ड चित्रपट असणार आहे. तसेच चित्रपटामध्ये अजय देवगन हॉकी प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

‘चक दे इंडिया’ चित्रपटात याआधी शाहरुख खानने हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. निर्माते बोनी कपूर यांच्याशी बोलणी सुरु असून रवी लवकरच चित्रपटावर काम सुरू करणार आहेत. अजयने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली असून लवकरच तो त्याचा निर्णय कळवणार आहे. अजयने ही ऑफर स्वीकारल्यास त्याचा हा पहिलाच स्पोर्ट्स मूव्ही असेल. अजयची निर्मिती असलेला ‘आपला मानूस’ हा मराठी चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तसेच सध्या अजय त्याच्या आगामी ‘रेड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या