नाटक, अभिनय, गाणं… समाधान देणाऱ्या गोष्टी

देवभक्त असणं म्हणजेच प्रामाणिक असणं. सांगताहेत गायक, अभिनेते अजय पूरकर.

> देव म्हणजे? –देव म्हणजे श्रद्धा

> आवडते दैवत? – शंकर

> धार्मिक स्थळ? –माझ्या घरातलं देवघर

> आवडती प्रार्थना – देवाचं प्रत्येक वेळी केलेलं देवाचं स्मरण

> आवडते देवाचं गाणं? – मोरया, मोरया…

> धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का? – ‘स्त्रोत्र मंत्राचं विज्ञान’ आणि ‘गायत्री मंत्राचं महत्त्व’ ही पुस्तक वाचली आहेत. यामध्ये आपल्या ऋषींनी वेद, उपनिषद का लिहिली. उपनिषद म्हणजे काय, स्त्रोत्रांचं महत्त्व काय, ठराविक वेळेत ठराविक स्त्रsत्रच का म्हणायचं या सगळ्याची वैज्ञानिक कारणं दिली आहेत. हे पुस्तक मला वाचायला आवडतं.

> दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – हो, माझ्यासाठी देव म्हणजे श्रद्धा आहे. त्यामुळे श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट करणं हे एरव्ही अशक्य वाटतं, पण केवळ श्रद्धेमुळे ती गोष्ट होत असेल तर त्याला श्रद्धा म्हणायचं. एखादा माणूस आजारातून उठला असेल, प्रवासात निघाला असताना त्या गाडीचा अपघातल होणार असेल अशा गाडीत आपण चढत नाही, याला चमत्कारच म्हणतात.

> आवडता रंग? – आकाशी निळा

> अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – मला अभिनयानंतर खूप समाधान मिळतं. मग ते गाणं, नाटकातला अभिनय किंवा स्वतः बनवलेला पदार्थ असो. सर्जनशीलतेशी संबंधित काहीही, महत्त्वाचं म्हणजे चांगला परफॉर्मन्स हे समाधान देणारं असतं.

> दुःखी असतोस तेव्हा? – मी कोणाला भेटत नाही. एकटं राहणं पसंत करतो.

> नास्तिक लोकांबद्दल काय सांगाल? – आस्तिक, नास्तिक किंवा श्रद्धा असणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. प्रत्येकाने आपआपलं ठरवावं.

> देवभक्त असावं पण देवभोळं नसावं…तुमचं मत काय?- माझ्या मते प्रामाणिक असावं. श्रद्धा म्हणजे देव असेल तर ती माझ्यावर कामावरही आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या अवडंबर आहेत त्या मी करत नाही आणि मला आवडतही नाही.

> इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का? – नाही

> ज्योतिषशास्त्रवर कितपत विश्वास आहे? – नाही

> उपवास करता का – करतो पण फारसा नाही. माझ्यासाठी उपवास हा उपवासच असतो त्या दिवशी मी काहीही खात नाही.

> अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता? – वेगवेगळी पात्र मी आजपर्यंत रंगवलेली आहेत. प्रत्येक पात्राचा जो आत्मा आहे त्या व्यक्तिरेखेच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास ही माझ्यासाठी भक्ती आहे.

> मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना : प्रार्थना.