शहीदांच्या बलिदानाला देश कधीच विसरणार नाही – डोवाल

5

सामना ऑनलाईन, गुरुगाव

पुलवामा  हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याला देश कधी विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही, असे सांगत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दहशतवादाविरोधात लढा देण्यात देशाचे नेतृत्व सक्षम असल्याचे  सांगितले. CRPF च्या 80 व्या वर्धापनदिनानिमित्त हरयाणातील गुरुग्राम येथे आयोजित कार्यक्रमात अजित डोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

देशासमोर येणाऱ्या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे ताकद आहे, असे डोवाल म्हणाले. सीआरपीएफचे महत्त्व सांगताना डोवाल म्हणाले,  अंतर्गत सुरक्षा महत्वाची असते. दुसऱ्या जागतीक युद्धानंतर 37 देश असे होते जे उद्ध्वस्त झाले आणि आपले सार्कभौमत्व गमावून बसले. यामधील 28 देशांचे कारण त्यांचा देशांतर्गत संघर्ष हे होते. देश दुबळा असतो कारण त्यांची अंतर्गत सुरक्षेत कमजोर असते. अशावेळी  देशांतर्गत शांतता आणि कायदा- सुव्यवस्थेत

सीआरपीएमची जबाबदारी महत्त्वाची  आहे.
अजित डोवाल यांनी देशाच्या फाळणीवेळी सीआरपीएफच्या योगदानाचे कौतुक केले. फाळणीच्यावेळी खूपच कमी संख्या असतानाही सीआरपीएफने सुरक्षेच्यादृष्टीने जी महत्वाची भूमिका निभाकली, त्यावर एक पुस्तक लिहीले जाऊ शकेल, असे ते म्हणाले.