ऐतिहासिक निर्णय! गुरुवारपासून अजनी रेल्वेस्थानकावर ‘महिला’राज

सामना प्रतिनिधी । नागपूर

महिला दिनाचे औचीत्य साधून माटुंगा स्टेशनच्या धर्तीवर गुरुवारपासून अजनी रेल्वेस्थानकाचा ताबा महिला कर्मचारी घेणार आहेत. याची रंगीत तालिम बुधवारी रेल्वेस्थानकावर घेण्यात आली. स्टेशन मॅनेजर माधुरी चौधरीसह इतर विभागाच्या प्रमुख महिलांनी अजनी स्टेशनचा ताबा घेतला. प्रत्यक्षात उद्यापासून त्या कामाला सुरूवात करणार आहेत.

रेल्वे प्रशासनातर्फे महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा, मात्र संपूर्ण रेल्वेस्थानकाचा कार्यभार दीर्घ काळ महिलांकडे सोपवून इतिहासात नवीन अध्याय जोडण्याचा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा प्रयत्न आहे. अजनी स्थानकावर गुरुवारपासून महिला राज राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने २८ मार्चला अजनी स्टेशनवर नियुक्त करण्यात येणारया कर्मचारयांचे नियुक्तीपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. १ मार्चला कर्मचाऱ्यांना या नियुक्त्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार बुधवारी स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरीसह चार कमर्शियल क्लर्क, चार तिकीट कलेक्टर, चार लगेज पार्सल पोर्टर (एलपीपी), चार सफाई कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला असा संपूर्ण २८ कर्मचारी महिला कर्मचाऱ्यानी आपापल्या कामाचा पदभार स्विकारला.

गुरुवारी सकाळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत या स्थानकावर नियुक्त महिला अधिकारी व कर्मचारी समारंभपूर्वक पदभार स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी रेल्वेच्या वाणिज्य आणि अभियांत्रीकीच्या अधिकाऱ्यांनी स्टेशनला भेट देउन आढावा घेतला. नवनियुक्त स्टेशन मॅनेजर म्हणाल्या की, गेल्या २८ वर्षांपासून हे काम करीत आहोत. आताही पुढील कामासाठी आम्ही तय्यार असल्याची प्रतिक्रीया नोंदविली. गुरुवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याने येणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. उद्यापासून महिलांना सन्मानपूर्वक निर्भयतेने पूर्ण स्टेशन सांभाळालयला दिले जाणार आहे. त्यामुळे अचूक नियोजन, सर्वत्र स्वच्छता आणि भ्रष्टाचारमुक्त, शिस्तबद्ध कामे होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हा उपक्रम मुली, तरुणी, युवती, महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.