पाहा व्हिडीओ : अकाली दलाच्या नेत्याला बेदम मारहाण, तोंडाला फासले काळे

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

अकाली दलाचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष मनजीत सिंग जीके यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे खलिस्तान समर्थकांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात सिंग यांच्या तोंडाला काळे फासल्याचे देखील दिसत आहे.

मनजित सिंग यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. ‘वीस पेक्षा अधिक लोकांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर हल्ला करताना ते लोकं आपण गुरुद्वारेत आहोत हे देखील विसरले होते. पण मला त्याचे भान होते त्यामुळे मी माझ्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पण या अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. मला खात्री आहे ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ते आयएआयशी संबंधित होते’, अशी प्रतिक्रिया मनजित सिंग यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

summary : Akali Dal leader Manjeet Singh GK attacked, face blackened outside a Gurdwara in California