सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार

27


सामना ऑनलाईन, परळी

परळीमध्ये 22 फेब्रुवारी रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विवाहसोहळ्याला अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सर्व धर्मातील जवळपास 100 जोडपी या सामुदायिक विवाहसोहळ्यात विवाहबद्द होणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने या सामुदायिक लग्नसोहळ्याचे आयोजन केले आहे. मराठवाडा दुष्काळात होरपळतोय. अशावेळी या दुष्काळाचे सावट लग्नघरावर पडू नये यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात वधू वरांचे कपडे, सोन्याचे मणी-मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य नवदांपत्यांना भेट देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या