Video : अक्षय कुमारने जवानांसोबत साजरी केली होळी

5

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अभिनेता अक्षय कुमार याने आज दिल्लीत बीएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी केली. अक्षय कुमारचा जवानांसोबत नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वेळी त्याची केसरी चित्रपटातील अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील होती.

अक्षयने दिल्लीतील कॅनॉट पॅलेस येथील बीएसएफच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी जवानांसोबत त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या व जवानांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यानंतर केसरी या त्याच्या चित्रपटातील सानू केंदी या गाण्यावर तो जवानांसोबत थिरकला.

साराग्रही लढाईवर आधारीत अक्षय कुमारचा केसरी हा चित्रपट येत्या 21 मार्चला प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये सध्या अक्षय कुमार व्यस्त आहे.