अभिनेता अक्षय कुमारने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘अराजकीय’ मुलाखत

73

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली आहे. अक्षय कुमारने एएनआय या वृत्तसंस्थेसाठी ही  मुलाखत घेतली असून बुधवारी सकाळी 9 वाजता ती प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

नेहमीची गोष्ट सोडून मी आज एक वेगळी गोष्ट करत आहे असे अक्षय कुमारने एका ट्विटमध्ये म्हटले होते. यासाठी आपण खूप उत्सुक आहोतच परंतु खूप दडपण आल्याचेही त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यानंतर अक्षय निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. परंतु आपण निवडणूक लढवत नसल्याचे अक्षय कुमारने जाहीर केले होते. जर निवडणूक नाही तर नेमके काय असे प्रश्न अक्षयच्या चाहत्यांना पडला होता. परंतु या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे. पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमारने घेतली आहे. त्याचा टीझर त्याने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

ही मुलाखत संपूर्ण अराजकीय असल्याचे अक्षयने म्हटले आहे. सध्या देशात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अराजकीय गप्पा मारल्याचे अक्षयने ट्विटवर म्हटले आहे. तसेच मंगळवारी एएनआय वर ही मुलाखत प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याचेही अक्षयने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या