‘या’ राज्यात बलात्काऱ्यांना देणार नपुंसकतेचं इंजेक्शन

26

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

13 वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करण्याचा निर्णय अमेरिकेतील अलबामा राज्याच्या सरकारने घेतला आहे. बलात्काऱाचे आरोप निश्चित झालेल्या दोषींना पॅरोलवर सोडण्याआधी त्यांना नपुंसकतेचं इंजेक्शन देण्यात येईल.

अलबामा राज्यातील सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, बलात्काराचा आरोपी पॅरोलवर असताना पुन्हा तशाप्रकारचा गुन्हा करू नये म्हणून त्याला नपुंसकतेचं इंजेक्शन देण्यात येईल. या इंजेक्शनमुळे त्याच्या पॅरोलच्या काळात त्याची सेक्स करण्याची इच्छा होणार नाही. या इंजेक्शनचा परिणाम हा फक्त त्याच्या पॅरोलच्या कालावधीपर्यंतच राहणार आहे. तसेच त्याचा खर्चही आरोपीकड़ूनही घेण्यात येणार आहे. हे इंजेक्शन टोचून घेण्यास नकार देणाऱ्यांना पॅरोल मंजूर केला जाणार नाही.

अमेरिकेतील फ्लोरिडा, लुसिआना सहीत आणखी पाच राज्यात अशा प्रकारचे इंजेक्शन बलात्काऱ्यांना दिले जाते. अशा प्रकारचा कायदा करणारा अलबामा हा अमेरिकेतील आठवा देश ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या