चंद्रावरही होती एलियनची वस्ती!

सामना ऑनलाईन । लंडन

परग्रहावर जीवसृष्टी असल्याचा अंदाज वतर्वण्यात येतो. मात्र, आपल्याच पृथ्वीच्याच उपग्रहावर म्हणजेच चंद्रावरही एलियनची वस्ती होती असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. उल्कापातानंतर चंद्रावर एलियनला राहण्यायोग्य वातावरण तयार झाल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. त्याकाळातील वातावरण आजच्यापेक्षा अधिक चांगले असल्याचा दावाही वैज्ञानिकांनी केला आहे.

चार अब्ज वर्षांपुर्वी चंद्रावर जीवसृष्टीच्या निर्मितीला अनुकूल वातावरण तयार झाल्याचे ग्रहांबाबत अभ्यास करणाऱ्या दोन वैज्ञानिकांनी सांगितले. सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपुर्वी चंद्रावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर तेथे जीवसृष्टीला पोषक वातावरण तयार झाले. ज्वालामुखीसारख्या घटनांमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर गरम पाण्याचा स्रोत तयार झाला. त्यामुळे जीवसृष्टीची निमिर्ती झाली असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

चंद्रावर अब्जावधी वर्षांपुर्वी पाणी आणि वातावरण असल्याने जीवसृष्टीसाठी पोषक स्थिती होती, असे वॉशिंग्टन विद्यापीठातील अंतराळ संशोधन तज्ज्ञ डिकर् शुल्ज माकुच यांनी म्हटले आहे. लंडन विद्य़ापीठातील या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक इयान क्राफॉर्ड यांच्यासह शुल्ज यांनी चंद्रावरील जीवसृष्टीबाबत अभ्यास केला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेटीक फिल्डचे कवच होते. त्यामुळे दूषित आणि उष्ण हवामानापासून जीवसृष्टीचे रक्षण झाल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.