रायगडात सरासरी 59 टक्के मतदान

1

सामना प्रतिनिधी। अलिबाग

वाढत्या उन्हाचा फटका मंगळवारी रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदानाला बसला. येथे सरासरी 59 टक्के एवढे मतदान झाले असून महायुतीचे उमेदवार अनंत गीते, आघाडीचे सुनील तटकरे यांच्यासह 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मशीनमध्ये बंदिस्त झाले.

महाड, पेण, कालवलीमध्ये ईव्हीएमचा खेळखंडोबा

रायगड लोकसभेतील महाड मतदारसंघात ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या सर्वाधिक तक्रारी आल्या. महाड तालुक्यातील नागाव, भेलोशी, मुमुर्शी, करंजमाळ आणि दाभोळ येथील यंत्रे मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच बिघडली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱयांनी तंत्रज्ञांच्या मदतीने मशीन दुरुस्त केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांच्या फरकाने मतदान पुन्हा सुरू झाले. पेणमध्येही ईव्हीएम मशीनचा खेळखंडोबा झाला. कन्या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 109 मध्ये तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद पडले. रायगड जिल्हा परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांना पेणमधील रावे केंद्रावर शेकापच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करीत मारहाण केल्याची घटना घडली.

एकूण मतदान
पेण – 61 टक्के
अलिबाग – 62.26 टक्के
श्रीवर्धन – 55 टक्के
महाड – 60 टक्के
दापोली – 62 टक्के
गुहागर – 60 टक्के