नवीद अंतुले यांच्‍या सेना प्रवेशानंतर मुस्‍लीम तरूण शिवसेनेकडे


सामना प्रतिनिधी। अलिबाग

रायगडमधील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्‍या ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार सभांमध्‍ये मुस्‍लीम तरूण मोठया संख्‍येने शिवसेनेत प्रवेश करू लागलेत. यामुळे राष्‍ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांची चिंता वाढली आहे.

आंबेत या बॅरिस्‍टर अंतुले यांच्‍या जन्‍मगावी झालेल्‍या शिवसेनेच्‍या मुस्‍लीम समाज मेळाव्‍याला जवळपास 2 हजार मुस्‍लीमांनी हजेरी लावली. विशेष म्‍हणजे मुस्‍लीम समाजातील महिलाही मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. मुस्‍लीम समाजाकडे व्‍होट बँक म्‍हणून काही लोक पहात होते परंतु त्‍यांची जहागीरी संपली असल्‍याचा टोला अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना यावेळी लगावला.

आतापर्यंत मुस्‍लीम समाजाला शिवसेनेची भीती दाखवून मुख्‍य प्रवाहापासून दूर ठेवले जात होते. परंतु या समाजाने आता या विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात सहभागी व्‍हावे, असे आवाहन नवीद अंतुले यांनी यावेळी केले. यावेळी मतदार संघातील शिवसेनेचे मुस्‍लीम पदाधिकारी, लोकप्रतिनिधीदेखील उपस्थित होते.