प्रियकराच्या हत्येप्रकरणी प्रेयसीला आजन्म कारावासाची शिक्षा

5

सामना प्रतिनिधी। अलिबाग

प्रियकराला विष देऊन त्याची हत्या केल्याप्रकरणी प्रेयसीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना 28 मे 2011 साली घडली असून न्यायालयीन सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी उपलब्ध पुराव्याच्या आधारावर आरोपीला शिक्षा सुनावली. दरम्यान ,या घटनेमुळे अलिबाग तालुक्यातील रांजणपाडा परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. सदर प्रकरणाची मंगळवारी अलिबाग येथील सत्र न्यायालयात सुनावणी होती. यावेळी न्यायालयाने आरोपी प्रेयसी निता कुलकर्णी हिला या हत्येप्रकरणी दोषी ठरवित आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

छगन टिकारामजी सोळंकी असे या दुदैवी प्रियकराचे नाव असून त्याचे निता कुलकर्णी हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. विवाहाच्या आणाभाकाही त्यांनी घेतल्या होत्या. या प्रेमात निताने छगनकडून वेळोवेळी पैशांची मागणी करुन पैसेही घेतले होते. मात्र कालांतराने तीला तो आवडेनासा झाला. त्यातच छगन तिला वारंवार लग्नाबाबत विचारत असे मात्र ति त्याला नकार देत होती. मात्र छगन काही मागे हटत नव्हता. यामुळे कंटाळलेल्या निताला तो आपली बेअबुू करेल या भीतीने तिने त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले.

आपली प्रतिक्रिया द्या