अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर वादळी वाऱ्यांची धडक

46

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने चक्रीवादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविले आहे. चक्रीवादळ हे खोल समुद्रात होणार असले तर याचा फटका समुद्र किनारी भागाला बसणार आहे. समुद्र किनारी वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याने झाडे उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

अरबी समुद्रात खोल चक्रीवादळ होणार असले तरी हे वादळ आता गुजरातकडे वळले आहे. मात्र तरीही जिल्ह्याच्या किनारपट्टीवर याचा परिणाम जाणवत आहे. सकाळपासून वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली असून समुद्रही खवळलेला आहे. वारे हे जोरात वाहत असल्याने झाडे वाऱ्यामुळे जोरजोरात हलत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या