‘खूप उशिरा जाग आली’, ट्विंकल शर्मा हत्येप्रकरणी ट्विटनंतर स्वरा ट्रोल

258

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अलीगडमध्ये अडीच वर्षाच्या ट्विंकल शर्मा हिच्या निर्घृण हत्येचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. 30 मे रोजी ट्विंकल घराबाहेर खेळत असताना गायब झाली होती. दोन दिवसानंतर तिचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत सापडला होता. हत्येपूर्वी तिच्यावर भयानक अत्याचार करण्यात आले होते. ही घटना उघड आल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता आणि आरोपींना फाशी देण्याची मागणी होत आहे. ही घटना उघड झाल्यानंतर आता तब्बल 10 दिवसांनी अभिनेत्री स्वरा भास्करने याचा निषेध केला आहे. यामुळे नेटिझन्सने तिच्यावर संताप व्यक्त केला आहे.

ट्विंकल शर्मा हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी स्वरा भास्करने ट्वीट केले. ‘रशियातून ब्रेकनंतर परतले असून सोशल मीडियापासूनही ब्रेक घेतला होता. अलीगडमध्ये दोन वर्षांच्या ट्विंकल शर्माची झालेली हत्या खूपच भयानक आहे. आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी जेणेकरून असे घृणास्पद कृत्य पुन्हा घडू नये. कुटुंबासाठी मी प्रार्थना करते, असे ट्वीट स्वराने केले.

स्वराच्या ट्वीटनंतर नेटिझन्सने तिला खूप उशिरा जाग आल्याचा टोला लगावला. नेटिझन्सने तिला ट्रोल करणे सुरु केले. एका युझरने लिहिले, ‘असीफा रेप केसमध्ये प्लेकार्ड उचलणारी स्वरा, यावेळी तू असे का नाही केलेस ?’ आणखी एका यूजरने लिहिले, ‘खूप उशीर केलात मॅडम येता येता.’ तर अनेकांनी तिला रशियामध्ये इंटरनेट नाही का असाही सवाल केला.

आपली प्रतिक्रिया द्या