अंबाजोगाई – परळी रोडवर ट्रक-ट्रॅक्टरचा अपघात, २ ठार

12


सामना ऑनलाईन । परळी

लाईक कराट्विट करा

अंबाजोगाई – परळी रोडवर वरवटी जवळ कापसाच्या गाठी घेऊन जात असलेला ट्रक आणि ट्रॅक्टर यांची टक्कर झाली. टक्कर झाल्यानंतर लागलेल्या आगीत ट्रक आणि ट्रॅक्टर जळून खाक झाले. या अपघातात ट्रकचालक शेख अलीम (२६) आणि ट्रॅक्टर चालक राम अर्जुन शिंदे (३७) यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक राम शिंदे हे अंबाजोगाईतील परळी वेस भागातले रहिवासी आहेत.

अपघातामुळे काही काळ अंबाजोगाई – परळी रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या