अंबानी विरुद्ध अंबानी

2

रिलायन्सच्या जिओने मोबाईल इंटरनेट क्षेत्रात एकच धुमाकूळ घातला. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी स्पर्धक कंपन्यांनी नाना शक्कल लढवल्या, काही कंपन्या तर या युद्धासाठी एकत्रीकरण करून मैदानात उतरल्या. जिओ विरुद्ध इतर स्पर्धक कंपन्यांच्या या लढाईत आता एक अनोखे वळण आले आहे. मुकेश अंबानींच्या जिओला टक्कर देण्यासाठी चक्क अनिल अंबानींची आरकॉम ही कंपनी सरसावली आहे. आरकॉम कंपनीने आपल्या थ्रीजी आणि टूजी डेटा ग्राहकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यात ४९ रुपयांत अनलिमिटेड टूजी डेटा मिळणार आहे, तर ९९ रुपयांत अनलिमिटेड थ्रीजी डेटा मिळणार आहे. ९९ रुपयांच्या रिचार्जवर अमर्याद थ्रीजी डेटा, याशिवाय २० रुपयांचा टॉकटाइम अशी अनोखी योजनादेखील मुंबई, कोलकाता, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब इ. प्रांतासाठी देण्यात आलेली आहे. ही योजना पूर्ण २८ दिवसांसाठी असल्याने ही आजवरची सगळय़ात स्वस्त योजना मानली जात आहे.

ambani-vs-ambani