उपनगरातला महोत्सव

सामना प्रतिनिधी

उपनगरातील पहिला चित्रपट महोत्सव म्हणून कौतुकाचा विषय ठरलेल्या ‘अंबर भरारी’ या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवातील पुरस्कारांचे वितरण २६ नोव्हेंबरला अंबरनाथच्या गावदेवी मैदानात होणार आहे. यंदाचे महोत्सवाचे तिसरे वर्ष असून यावेळीही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. ‘नातवंड’, ‘मुंबई किनारा’, ‘सॉरी’, ‘रायरंद’, ‘नॉट अ ब्रेकिंग न्यूज’, ‘हॅप्पी बर्थ डे टू यू’, ‘नऱ्या’, ‘घुमा’, ‘खोपा’, ‘प्रतिभा’, ‘काव्या’, ‘बाळ भीमराव’, ‘ब्रेव्हहार्ट’, ‘गणू’, ‘ट्रकर’ असे एकाहून एक सरस मराठी चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात आले.

योगेश सोमण यांच्या ‘माझं भिरंभिरं’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात २१ सप्टेंबरला झाली, तर ३० ऑक्टोबर रोजी गिरीश मोहिते यांच्या ‘सर्वनाम’ चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली. ‘अंबर भरारी’ संस्थेचे संस्थापक सुनील चौधरी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, निखील चौधरी आदींनी महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली, तर महोत्सव समितीतील जगदीश हडप, गिरीश पंडित, अभय शिंदे, अनिल कवठेकर, डॉ. राहुल चौधरी यांनी चित्रपटांचे परीक्षण केले.