‘कौन बनेगा करोडपती’मध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी झाला लखपती

सामना प्रतिनिधी । अंबरनाथ

‘कौन बनेगा करोडपती’ या अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमात हॉट सीटवर बसावे असे अनेकांचे स्वप्न असते. अंबरनाथ नगरपालिकेत आरोग्य विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेला मनीष पाटील हा केवळ त्या हॉट सीटवर बसलाच नाही तर त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देत साडेबारा लाख रुपये जिंकले.

अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना विश्वासाने उत्तरे देत मनीष साडेबारा लाखांपर्यंत जाऊन पोहोचला. पुढचे उत्तर दिले असते तर चक्क पंचवीस लाख मिळणार होते, मात्र हे उत्तर चुकले तर बक्षिसाची रक्कम थेट तीन लाखांवर येणार होती. त्यामुळे खेळ सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि मनीष याला साडेबारा लाखांचा चेक मिळाला तेव्हा त्याच्या डोळ्यांत होते आनंदाश्रू. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी मनीष याचा सत्कार केला.