शंभर वर्षापूर्वीच्या न्यूड पेटींगला लिलावात मिळाले १० अब्ज ६० कोटी

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

प्रसिद्ध चित्रकार अॅमेदियो मोदीग्लियानी यांनी १९१७ साली काढलेल्या न्यूड पेंटींगला लिलावात रेकॉर्डब्रेक किंमत मिळाली आहे.पेटींग आर्ट डिलर कंपनी सोथबेने हा लिलाव केला. त्यात या न्यूड पेंटींगला १५७ मिलियन डॉलर म्हणजेच १० अब्ज ६० कोटी रुपये किंमत मिळाली आहे. सोथबेच्या २७४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पेंटींगला एवढी किंमत मिळाली आहे.

या पेंटीगमध्ये एक महिला बेडवर नग्नावस्थेत पाठमोरी पहुडलेली दिसत आहे. या पेटींगला अनेक प्रदर्शनातही ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये लिलावात ही पेंटींग १० अब्ज ६० कोटी रुपयात विकली गेली.

या लिलावात प्रसिद्ध चित्रकार पिकासो यांचेही ४५ पेटींग्ज ठेवण्यात आले होते. यातील १३ पेंटींग्जसाठी खरेदीदार मिळाला नाही. खरेदीदार न मिळणाऱ्यांमध्ये पिकासो यांच्याव्यतिरिक्त हेनरी मोरे आणि मार्ग चॅगल यांच्याही पेंटींग्जचा समावेश आहे.
लिलावात मोठी रक्कम मिळवणाऱ्या ही न्यूड पेंटींग २००३ मध्ये २,६९कोटी डॉलरला लिलावात विकली गेली होती. पंधरावर्षानंतर या पेंटींगच्या किंमतीत सहापट वाढ झाली आहे.

दरम्यान ही न्यूड पेंटींग बनवणारे अॅमेदियो मूळचे इटलीचे होते.त्यांना पेंटींग्ज काढण्याची आवड होती.पेंटींगला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. यामुळेच त्यांचा जगातील नामांकित चित्रकारांमध्ये समावेश झाला. पण हा जगप्रसिद्ध चित्रकार अवघ्या ३५ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला.