चोरी झालेल्या 800 वर्षे जुन्या मूर्ती अमेरिकेकडून हिंदुस्थानला सुपुर्द

सामना ऑनलाईन । न्युयॉर्क

भारतातून चोरी झालेल्या 800 वर्षे जुन्या दोन मूर्त्या अमेरिकेच्या संग्रहालयात होत्या. या दोन मुर्त्यांची  किंमत जागतिक बाजारपेठेत शेकडो रुपयांत आहे. नुकतेच अमेरिकेने या दोन मूर्त्या हिंदुस्थानला सुपुर्द केल्या आहेत. पहिली मूर्ती ही लिंगोधभा मूर्ती असून ती 12 व्या शतकातली आहे. महादेवाची ही मूर्ती असून, ग्रेनाईटपासून तिची निर्मिती झालेली आहे. ही मोर्ती चोल काळातील आहे. या मूर्तीची किंमत सध्या दोन लाख 25 हजार डॉलर इतकी आहे. तमिळनाडूतून ही मूर्ती चोरीला गेली होती. अमेरिकेच्या अलबामामधील बर्घिमम संग्रहालयात ती पोहोचली होती.

दुसरी मूर्ती ही बोधिसत्व मंजूश्री असून त्यांच्या हातात तलवार आहे. तसेच ही मूर्ती सोनेरी रंगाची असून 1980 च्या दशकात बिहारच्या बोधगयातील एका मंदिरातून ही चोरी झाली होती. या मूर्तीची किंमत सध्या दोन लाख 75 हजार डॉलर इतकी आहे. ही मूर्ती कॅरोलिना विद्यापीठाच्या ऑकलँड आर्ट संग्रहालयात सापडली. न्युयॉर्कच्या वाणिज्य दुतावासाच्या कार्यक्रमात अमेरिकेने या मूर्ती हिंदुस्थानकडे सुपुर्द केल्या.