अमेरिकेचा पाकिस्तानला दणका, हाफिजनंतर तिघं जागतिक दहशतवादी घोषित

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध आता पूर्वीसारखे राहिले नसल्याचे जगजाहीर आहे. आता पुन्हा एकदा अमेरिकेने पाकिस्तानला दणका दिला आहे. हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोएबा आणि तालिबानच्या तीन दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. यासोबतच पाकिस्तानने आपल्या देशातील दहशतवाद्यांचा आणि खतरनाक दहशतवादी संघटनांचा खात्मा करावा अशी चपराकही अमेरिकेने लगावली.

जगभरातील अनेक देश दहशतवादाने ग्रस्त आहेत. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचे सातत्याने समोर आले आहे. याचमुळे बुधवारी अमेरिकेने तीन दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी घोषित केले. रहमना जेब फकीर मुहम्मद, बिजबुल्लाह अस्तम खान आणि दिलावर खान नादिर खान अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. तसेच या तिन्ही दहशतावाद्यांची संपत्ती आणि अमेरिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणारे व्यवहार ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच अमेरिकी नागरिकांनाही या तिघांसोबत कोणत्याही प्रकारचा देण्या-घेण्याचा व्यवहार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केलेला रहमान जेब फकीर मुहम्मद हा लश्कर-ए-तोएबाला आर्थिक सहाय्य आणि तात्रिंक मदत मिळवून देण्यासाठी कार्य करत होता. २००९मध्ये अलकायदा, लश्कर आणि तालिबानला समर्थन दिल्यामुळे त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले होते. दुसरा दहशतवादी हिजबुल्लाह अस्तम खान याने २०१६पर्यंत पेशावरमधील एका मदरशातील आर्थिक व्यवहार पाहिले. त्यानंतर अफगाणिस्तानातील कुनार प्रांतामध्ये विस्फोटनक विशेषज्ञ म्हणऊन काम केले आणि सैन्याविरोधात बॉम्बची पेरणी केली. तिसरा दहशतवादी दिलावर खान नादिर खान यानेही लष्कर आणि तालिबानला आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी कार्य केले.