हिंदुस्थानची लेक बनली मिस युनायटेड नेशन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानची लेक असलेल्या अमिषा चौधरी हिने अमेरिकेच्या मिस युनायटेड नेशन २०१७ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तब्बल ७० देशांमधून आलेल्या तरुणींमधून अमीषाची निवड केली गेली. मूळची फरीदाबाद इथली असलेली अमीषा विवाहित असून या स्पर्धेसाठी तिचे पती रुद्राक्ष यांनी तिला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

यापूर्वीही अमीषा हिने मिसेस साउथ एशिया स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिला अमेरिकेतल्या मिस युनायटेड नेशन स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती. अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी अविवाहित अथवा विवाहित असण्याची कोणतीही अट नाही.

मिस युनायटेड नेशन २०१७ चं विजेतेपद मिळवल्यानंतर अमीषाला महिला सबलीकरण आणि शिक्षणासाठी कार्य करण्याची इच्छा आहे. त्याचसोबत तिला फॅशन इंडस्ट्रीतही काम करण्याची इच्छा असल्याचं तिने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.