अमिषा पटेल काँग्रेसच्या प्रचाराला आली, गुजरातची प्रशंसा करून गेली

4

सामना ऑनलाईन । वडोदरा

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आता सेलिब्रिटींनीही काही पक्षाच्या प्रचाराचा झेंडा हाती घेतला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिनेही गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. परंतु तिने अजाणतनेपणे काँग्रेस ऐवजी भाजपचाच प्रचार केला आहे. गेली 21 वर्षे गुजरामध्ये भाजपचे राज्य आहे. परंतु जसा गुजरातमध्ये विकास झाला तसाच देशात व्हावा अशी इच्छा अमिषा पटेलने व्यक्त केली.

अमिषा पटेल म्हणाली की, “गुजरात हे विकासाचे प्रतीक आहे. जर प्रत्येक राज्य गुजरातसारखे झाले तर देश खुप पुढे जाईल” यामुळे काँग्रेस चांगलीच पेचात सापडली होती.