गांधीनगरमधून अमित शहांनी मोडला लालकृष्ण आडवाणींचा विक्रम

5
nrc assam - Amit shah -assam visit

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरमधून विजय मिळवत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा विक्रम मोडला आहे. अमित शहा यांनी पहिल्यांदाच गांधीनगर मतादारसंघातून लोकसभा निवडणुक लढवली आहे. तसेच या निवडणुकीत अमित शहा यांनी आडवाणी यांचा 4 लाख 83 हज मतांचा विक्रम मोडीत काढला आहे.

गांधीनगर हा भाजपचा बालेकिल्ला असून अमित शहा यांनी तब्बल 5 लाख 11 हजार 180 मतांनी काँग्रेसचे उमेदवार सीजे चावडा यांचा पराभव केला आहे. लालकृष्ण आडवाणी यांनी 1989 पासून सलग 6 वेळा गांधीनगर मतदारसंघातून विजय मिळवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या