अमित शहांना स्वाईन फ्लू नाही, वेगळ्याच कारणासाठी एम्समध्ये दाखल!


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहांवर तेथे उपचार सुरू असून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या आजाराबाबत आणि प्रकृतीबाबत वादग्रस्त वक्तव्य केली. यापैकीच एक काँग्रेस नेते बी.के. हरिप्रसाद यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. एम्समध्ये माझीही ओळख असून अमित शहा यांना दुसऱ्याच कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा हरीप्रसाद यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

कर्नाटकच्या शापामुळे अमित शहांना डुकराचा आजार, काँग्रेस नेत्याची बेताल टीका
देश वाचवायचा की दंगल घडवणाऱ्यांना? शहांच्या फ्लूवर हार्दिकचे वादग्रस्त ट्वीट

शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना हरीप्रसाद म्हणाले की, ‘अमित शहा यांना कोणताच फ्लू झालेला नाही. ते फ्लूमुळे एम्समध्ये दाखल झालेले नाही. आमचीही एम्समध्ये चांगली ओळख आहे. मला याबाबत पूर्ण माहिती काढण्यासाठी वेळ हवा, ती मिळाली की सर्वांसमोर यामागील सत्य आणूनच राहील.’

दरम्यान, काँग्रेस नेत्याने केलेल्या या दाव्यामुळे नक्की अमित शहा यांनी झालेय काय याबाबत सोशल मीडियावरही आता चर्चा रंगली आहे. याआधी अमित शहा यांना कर्नाटकचा शाप लागला असून त्यामुळेच त्यांना डुकराचा रोग झाला असे वादग्रस्त वक्तव्य हरीप्रसाद यांनी केले होते. यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, हिच काँग्रेसची संस्कृती असल्याचे म्हटले होते.