युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा- अमित शहा

amit-shah

सामना ऑनलाईन, मुंबई

युतीचा निर्णय पक्ष घेईल. तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असा आदेश भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱयांना दिला. ते मुंबई दौऱ्यावर असून आज त्यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील पदाधिकाऱ्यांशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला.

शहा यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी एकाधिकारशाहीचा आरोप केला. मात्र, शहा यांनी लोकशाही पद्धतीने काम करत राहावे, असे आवाहन केले. विस्तारकांना ‘एक बुथ २५ युथ’ असे सूत्र राबवायला सांगून २३ सूत्री कानमंत्र दिला. यात भाजपचे पारंपरिक मतदार, काठावरचे मतदार आणि भाजपविरोधी मतदार अशा तीन गटांत मतदारांची वर्गवारी करावी, जात-धर्म-भाषानिहाय मतदारांच्या वर्गवारी करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, दिलेले काम निश्चित वेळेत प्रामाणिक केले तर इतर पक्षांवर युतीसाठी अवलंबून राहावे लागणार नाही, असे कानमंत्र दिले.