दर्यादिल बिग बी, 2100 शेतकऱ्यांचे कर्ज फेडले; शहिदांच्या कुटुंबीयांनाही करणार मदत

62

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा दर्यादिलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. शहंशाहाने बिहारमधील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी येथील 2100 शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी केला आहे. याची माहिती बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘आणखी एक वचन पूर्ण केले आहे. बिहारमधील ज्या शेतकऱ्यांवर कर्जाचा भार होता त्या 2100 शेतकऱ्यांचे कर्ज भेडण्यात आले आहे आणि वन टाईम सेटलमेंटद्वारे याची रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. यातील काही लोकांना बंगल्यावर बोलावले आणि अभिषेक-श्वेताच्या हस्ते त्यांना कर्ज फेडल्याचे पत्रक देण्यात आले.’

पहिली वेळ नाही…
शेतकऱ्यांची मदत करण्याची अमिताभ बच्चन यांची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी त्यांनी उत्तर प्रदेशमधील 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते. याआधी त्यांनी महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांचा सातबारा कर्जाच्या बोज्यातून मुक्त केला होता.

आणखी एक वचन बाकी
बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबीयांचा उल्लेख केला आहे. आणखी एक वचन पूर्ण करायचे आहे. पुलवामा हल्ल्यात देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या पत्नीला मदत करायची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या