फॉलोअर्स घटवल्याने अमिताभ बच्चन ट्विटर वापरणं बंद करणार

1

सामना ऑनलाईन, मुंबई

ट्विटर हे आजच्या घडीचं आपलं मत व्यक्त करण्याचं हिंदुस्थानातील बहुसंख्य कलाकारांची अत्यंत आवडीचं ठिकाण आहे. ट्विटरवर सगळ्यात जास्त असलेल्या अमिताभ बच्चन हे देखील ट्विटरचे मोठे चाहते होते. मात्र ट्विटरने त्यांचे अचानक फॉलोअर्स म्हणजेच त्यांचे ट्विटरवरील पाठीराखे कमी झाले आहेत. ही बातमी त्यांनीच दिली आहे आणि ती देखील ट्विटरवरूनच.


अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की “ट्विटर, तुम्ही माझे फॉलोअर्स कमी केलेत, ही एक गंम्मत वाटते आहे. आता रामराम ठोकण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी आभारी आहे. या समुद्रात अन्य बरेच मासे आहेत आणि ते जास्त चांगले आहेत” त्यांच्या या ट्विटमुळे अमिताभ बच्चन ट्विटरला गुडबाय करणार हे जवळपास निश्चित झालंय.

अमिताभ बच्चन यांच्यासारखा ग्राहक गमावणं हे ट्विटरसाठी परवडणारं नाहीये. त्यामुळे त्यांना आता पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावंच लागणार आहे. सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या अभिनेत्यांच्या यादीत अमिताभ बच्चन यांचा पहिला क्रमांक होता तर दुसरा क्रमांक शाहरूख खान याचा होता. आता शाहरूख खान फॉलोअर्सच्या बाबतीत अमिताभ बच्चन यांच्यापुढे निघून गेलाय. बच्चन यांच्या प्रशंसकांना यामागे काहीतरी गडबड असल्याचं वाटायला लागलंय. हे खरं असेल तर मग ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या वाढवणं, किंवा घटवणं हे सहज शक्य असून त्याचा प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो असा त्याचा अर्थ निघू शकतो.