‘बदला’ घेण्यासाठी येतोय..! बिग बींना टॅग करून शाहरूखची थेट धमकी

15


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांना शाहरूख खान याने सोशल मीडियावरून थेट धमकी दिली आहे. याचे ट्वीटही वेगाने व्हायरल होत आहे. यात त्याने बिग बी यांच्यासोबत बदला घेण्याचे वक्तव्य केले आहे. या ट्वीटमध्ये शाहरूखने अमिताभ बच्चन यांनाही टॅग केले आहे.

शाहरूखने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘मी तुमच्यासोबत बदला घेण्यासाठी येत आहे, बच्चन साहेब तयार रहा…!’ यावर नेटिझन्सची चर्चा सुरू झाली असतानाच अमिताभ बच्चन यांनीही तत्काळ याला रिप्लाय दिला असून हा प्रकार बदला घेण्याचा नसून आगामी चित्रपटाशी निगडीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

2016 मध्ये ‘पिंक’ या चित्रपटात दिसलेले अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू हे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. त्यांचा आगामी ‘बदला’ हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरूखने केलेल्या ट्वीटला उत्तर देताना बिग बी यांनी, ‘अरे भाई शाहरुख…बदला लेने का टाइम तो निकल गया…अब तो आप को बदला देने का टाइम है।’ असे ट्वीट केले आहे. तसेच एका ट्वीटमध्ये ते म्हणतात, बदला घेणे प्रत्येक वेळी योग्य नसते, परंतु प्रत्येक वेळी माफ करणे देखील योग्य नाही, असेही ट्वीट त्यांनी केले आहे.

‘बदला’ चित्रपटाचा ट्रेलर 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री विद्या बालन आणि तमिळ सुपरस्टार अजिथ यांच्यासोबत बोनी कपूरने सोशल थ्रिलरची पुनर्बांधणी केली आहे.  या चित्रपटाचे सहाय्यक निर्मिती शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या