‘ठाकरे’मधील माँसाहेबांच्या भूमिकेसाठी अमृता रावला दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

3

सामना ऑनलाईन । मुंबई

चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा अभिनेत्री अमृता राव हिला घोषित झाला आहे. अमृता हिने केलेल्या ठाकरे या चित्रपटातील भूमिकेसाठी मराठी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ठाकरे या चरित्रपटात अमृता हिने माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली होती. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला माँसाहेबांच्या भूमिकेसाठी मिळतोय, ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया अमृताने दिली आहे. ठाकरे या चित्रपटात माँसाहेबांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं आणि मध्ये इतका काळ जाऊनही प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमृता सध्या नवीन प्रकल्पात व्यग्र असून लवकरच त्याची घोषणा होणार आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या यशामुळे आपल्याकडे संहितांचा ओघ लागल्याचं अमृताचं म्हणणं आहे. सध्या चित्रपट हे माध्यम वेगाने बदलत असल्याने फक्त निवडक संहितांचा विचार करण्याचा मानसही तिने बोलून दाखवला आहे.