‘डान्स इंडिया डान्स’ शो होस्ट करणार अमृता

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठमोळय़ा अमृता खानविलकरला डान्सची आवड आहे हे तुम्हाला माहीतच असेल. या आवडीसाठी आता अमृता ‘डान्स इंडिया डान्स’च्या सहाव्या पर्वाची होस्ट असणार आहे. या कार्यक्रमाच्या सादरीकरणाची जबाबदारी अमृतावर असेल. यापूर्वी अमृताने ‘एकापेक्षा एक’, ‘नच बलिये ७’, ‘झलक दिखला जा ८’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला तसेच ‘मॅड २’ या शोमध्ये जजची धुराही सांभाळली होती.

पण आता ती ‘डान्स इंडिया डान्स’च्या ६ व्या पर्वाची होस्टिंग करणार आहे. या शोच्या ऑडिशनच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून याविषयी अमृताने आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटकर अपडेटही केले आहे.