गेवराई तालुक्यातील सर्वाधिक मतदानाचा फायदा कुणाला ? चर्चा रंगल्या

1

सामना प्रतिनिधी ।गेवराई

लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील 395 बुथवर एकुण 3 लाख 47 हजार 205  मतदारा पैकी 2लाख 34 हजार पाचशे 1 एवढे मतदान झाले असून मताची टक्केवारी 67. 20 पर्यंत गेली आहे. दरम्यान तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग बप्पा आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रितम मुंडे यांच्यात अटीतटीचा सामना झाला असून ‘लीड’ कोणाला मिळणार याविषयी तर्कवितर्क मांडले जात आहेत. ठिकठिकाणी अंदाज बांधले जात आहेत. चर्चा रंगू लागली असून, अनेकांनी पैजा लावल्या आहेत.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील 395 मतदान केंद्रावर शुक्रवार मतदान झाले. मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 436 केंद्राध्यक्षासह 1400 मतदान अधिकारी नियुक्त करुन 400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
55 झोनल अधिकारी हे सर्व ठिकाणी परिस्थिती वर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे कुठेही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. गेवराई मतदारसंघातील 395 बुथ साठी एकुण 3 लाख 47 हजार 205  मतदार आहेत. त्या पैकी एकूण  23 लाख 45 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मताची टक्केवारी 67.20पर्यंत गेली आहे. मतदान केंद्रावर एक प्रमाणे 400 पोलीस व 400 शिपाई यांची नियुक्ती केली होती.  6 संवेदनशील मतदानकेंद्रा वर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान गेवराई तालुक्यातून नेमका कोणाला पाठिंबा मिळतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, मतदारांनी कोणाला पसंती दिली याचा फैसला 23 मे रोजी होणार आहे.