जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

army_jawan
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । अनंतनाग

जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात हिंदुस्थानचे लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमक थांबली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी आणि हिंदुस्थानच्या जवानांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्रास्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, चकमक थांबवण्यात आली असली तरी देखील लष्कराने शोध मोहीम सुरू ठेवली आहे. आणखी काही दहशतवादी या भागात लपून बसल्याची शक्यता असल्याने लष्कराचे जवान या परिसरावर बारिक नजर ठेवून आहेत.