आंध्र प्रदेशात पेट्रोल-डिझेल 2 रुपये स्वस्त, महाराष्ट्रात कधी?


सामना ऑनलाईन । हैदराबाद

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनतेला महागाईची झळ सोसावी लागत आहे. त्यापासून जनतेला दिलासा देण्यासाठी म्हणून आंध्र प्रदेश सरकारने पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या दरात 2 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान पाठोपाठ आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू सरकारने हा निर्णय घेतला. मात्र असे असले तरी महाराष्ट्रातील जनतेला अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही