दिव्यामध्ये पुन्हा प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक

सामना ऑनलाईन, ठाणे

काही महिन्यांपूर्वी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा उद्रेक दिवा इथे झाला होता. या उद्रेकामुळे दिवा स्टेशनला फास्ट ट्रेनचा थांबा देण्याचा निर्णय झाला. बुधवारी रात्री पुन्हा एकदा दिवा स्टेशनमध्ये प्रवाशांचा उद्रेक झाला. दिवा-रोहा पॅसेंजर गाडी रोज उशिरा येत असल्याने प्रवासी भडकले होते. ज्यामुळे त्यांनी रूळावर उतरून आंदोलन केलं.

diwa-train-problem-2

दिवामध्ये ही पॅसेंजर रात्री ८ वाजता येणं अपेक्षित असतं मात्र ही गाडी बुधवारी एक तास उशिराने आली. गाडीमध्ये शौचालयाची सोय नाही, रोज गाडी उशिरा येते असं म्हणत प्रवासी रूळावर उतरले. त्यांनी कर्जत-कसाराकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन अडवून धरल्या. आरपीएफ च्या जवानांनी कसंबसं या प्रवाशांना रूळावरून हटवलं.

आंदोलन करणाऱ्या प्रवाशांची कशीबशी समजूत काढत अखेर दिवा-रोहा पॅसेंजर रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी रवाना करण्यात आली.