पब्लिसिटीसाठी केजरीवालांनी स्वत:वरच करून घेतला मिरचीपूड हल्ला?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर २० नोव्हेंबरला मिरची पूड फेकण्यात आली होती. अनिल शर्मा नावाच्या व्यक्तीने दिल्ली सचिवालयामध्येच हा हल्ला केला होता.या अनिल शर्माने न्यायालयामध्ये काही धक्कादायक आरोप केले आहेत. यातला महत्वाचा आरोप हा आहे की केजरीवालांवर मिरची पूड फेकून त्रास देण्याचा कट ‘आप’ च्याच नेत्यांनी रचला होता. पब्लिसिटी स्टंटसाठी  हा सगळा कट रचण्यात आल्याचा दावा अनिल शर्मा याने केला आहे.

केजरीवाल यांच्यावर मिरची हल्ला!

अनिल शर्मा याच्यातर्फे त्याच्या वकिलांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावत त्याची दिलासा देण्यास नकार दिला. न्यायाधीशांनी सुरक्षा व्यवस्थेत नेमकी कुठे चूक झाली हे शोधून काढण्याचे तपास यंत्रणांना आदेश दिले आहेत. अनिल शर्माने दावा केला आहे की त्याला सचिवालयामध्ये घुसण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने मदत केली होती. या व्यक्तीमुळे माझी कुठेही तपासणी झाली नाही असं शर्माने म्हटलं आहे.

भयंकर! मूल होत नाही म्हणून बायकोच्या गुप्तांगात मिरचीपूड टाकली

शर्माच्या वकिलांनी दावा केला आहे की केजरीवाल यांनी प्रसिद्ध मिळवण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांद्वारे स्वत:वर मिरची पूड हल्ला करवून घेतला होता. वकिलांनी हे देखील म्हटलंय की या प्रकरणात त्यांच्या अशिलाला विनाकारण गोवण्यात आलं आहे. ज्या दिवशी शर्माने केजरीवालांवर मिरची पूड फेकली त्या दिवशी केजरीवालांच्या घरी बोलावून ‘आप’ नेत्यांनी त्याला असं करायला सांगितलं होतं असंही त्याच्या वकिलांनी म्हटलं आहे.

एक प्रतिक्रिया

  1. Dear Mr. Editor,
    You are simply fool or making people fool.
    Few days back, you have written that “shetkaryana mirachi cha bhaav milel kaay”, in order to support Kejariwal.
    Now when the truth is coming out, you are changing your stance. What nonsense you are writing and jumping here and there daily.
    We will not change our vote for Modi and BJP based upon your so called Agralekhs ….