६ व्या क्रमांकावर येऊनही अंजू बॉबी जॉर्ज ऑलिम्पिक पदक जिंकू शकते ?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

अथेन्स ऑलिम्पिकमध्ये १४ वर्षांपूर्वी जेव्हा अंजू बॉबी जॉर्ज जेव्हा अथेन्स ऑलिम्पिकमध्ये धावायला सज्ज झाली होती तेव्हा देशातील प्रत्येकजण श्वास रोखून तिच्या प्रदर्शनाकडे पाहात होता. मात्र ती ६ व्या क्रमांकावर आल्याने हिंदुस्थानातील प्रत्येकाचीच निराशा झाली होती. मात्र ६व्या क्रमांकावर येऊनही अंजूला ऑलिम्पिक पदक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अथेन्स ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे तातान्या लेबेदोवा, आरिना सिमागीना आणि तातान्या कोतोवा या रशियाच्या धावपटू आल्या होत्या. या तिघींवरही उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चौथ्या क्रमांकावर मारिअन जोन्स आली होती जिचा चौथा क्रमांक उत्तेजक द्रव्य सेवन केल्याबद्दल आधीच काढून घेण्यात आला आहे. मारियन जोन्सनंतर पाचव्या क्रमांकावर असलेली ऑस्ट्रेलियाची ब्रॉनवीन थॉम्पसन चौथ्या क्रमांकावर सरकली आहे तर अंजू बॉबी जॉर्ज ही पाचव्या क्रमांकावर सरकली आहे. अंजूच्या जागी इंग्लंडची जेड जॉन्सन ६ व्या क्रमांकावर आली आहे.

हिंदुस्थानी अॅथलेटीक्स महासंघाने जगभरातील अॅथलेटीक्स महासंघांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हर गेर्स यांच्याकडे उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हिंदुस्थानप्रमाणेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महासंघांनीही ही मागणी केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हा निकाल रद्द करून रशियाच्या विजेत्या धावपटूंकडील मेडल्स काढून घ्यावीत अशी विनंती अॅथलेटीक्स महासंघाच्या आंतरराष्ट्रीय समूहाने म्हणजेच IAAF ने करावी अशी याचिकाही त्यांना केली आहे.