उपोषणामुळे अण्णा हजारे अशक्त, हॉस्पिटलमध्ये दाखल

2
anna-hazare-new
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

गेल्या आठवड्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालसाठीचे सरकारविरोधातील उपोषण मागे घेतले. मात्र त्यानंतर अण्णांना अशक्तपणा जाणवत आहे. बुधवारपासून जास्त अशक्तपणा जाणवू लागला. अशा परिस्थितीत चेकअप करणे खूप गरजेचे असल्याने डॉ. सय्यद आणि डॉ. धनंजय पोटे यांच्या सल्ल्यानुसार तपासणीसाठी नगरला आणण्यात आल्याची माहिती अण्णा हजारे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

युनिटी हॉस्पिटलचे डॉ. सुहास घुले यांच्याकडून नुकत्याच महत्त्वाच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. परंतु जास्त थकवा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी आज आणि उद्या दोन दिवस आणखी काही तपासण्या (पॅथॉलॉजिकल) व काही उपचारासाठी हॉस्पिटलला थांबवून घेतले आहे. सध्या नोबल हॉस्पिटलला डॉ. बंदिष्टी आणि डॉ. कांडेकर यांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. अण्णांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चिंतेचे काहीही कारण नाही, असेही कार्यालयातून सांगण्यात आले आहे.