अण्णा हजारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहीर

14

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सामाजिक कार्यात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी बुधवारी केली. 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवन येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात हजारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा चालू ठेवणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणूनही त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याचे देसाई यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या